पुणे : गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत असून 18 डिसेंबरपासून तापमानात (Weather) आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात आकाश निरभ्र असल्याने तापमानात बदल झाल्याची नोंद आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे. 

Continues below advertisement


दरम्यान, गुरुवारी शहरात मोसमातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असून शिवाजीनगर येथे तापमान 14 अंश सेल्सिअस होते. 10 डिसेंबररोजी सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअस ने अधिक असलेले शहराचे किमान तापमान 14 डिसेंबरपर्यंत2 अंश सेल्सिअसने घटले आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाली. 12 डिसेंबरला कमाल तापमान 31.4  अंश सेल्सिअस होते, तर 14 डिसेंबरला ते 28.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.


10डिसेंबर रोजी शिवाजीनगर येथे किमान तापमान 15.3 अंश सेल्सिअस होते. मात्र, 12 डिसेंबरपासून तापमानात हळूहळू घट होत असून, 14 डिसेंबरला तापमानात सरासरीपेक्षा 2अंश सेल्सिअसने घट झाली असून, शहरात तापमानाची नोंद झाली आहे. तापमानातील घसरणीचा हा ट्रेंड पुढील काही दिवस शहरात कायम राहण्याची शक्यता आहे.


'सध्या राज्यात आकाश निरभ्र अनुभवायला मिळत आहे. मात्र दक्षिण-आग्नेय द्वीपकल्पातून काही प्रमाणात आर्द्रता येत असल्याने आर्द्रतेत वाढ होत आहे. त्यामुळे पुढील 48 तास तापमान सध्याच्या पातळीवरच राहणार आहे. 18 डिसेंबरपासून राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून या वेळी तापमानात आणखी 2 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही तापमानात घट होणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. 


पुढील काही दिवसा वातावरण कसं असेल?


16 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
17 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
18 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
 19 डिसेंबर-आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
20 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
21 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
22 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाची बातमी-


Deepika Padukone : दीपिका पादुकोणला हॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याच्या मुलाची व्हायचं होतं आई; अभिनेत्रीचा खुलासा


Unseasonal Rain : अवकाळीग्रस्तांना सोमवारी मदतीची घोषणा होणार, पंचनामे अद्याप पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्र्यांचा निर्णय