Pulwama Attack 3rd Anniversary: आज जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातोय. मात्र, तीन वर्षांपासून हाच दिवस देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी काळा दिवस ठरला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करून हा दिवस रक्तरंजित केलाय. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली. त्यात 40 जवान शहीद झाले. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. 


दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले होते. आज देशभरात या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शहिद झालेल्या 40 शहिदांमध्ये सीआरपीएफच्या 76 व्या बटालियनच्या 5 जवानांचा समावेश होता. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतापजनक व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.





 


एका मॅसेजमुळं ठका बेलकरांचे प्राण वाचले
पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 जवानांच्या बसमध्ये  महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील कॉन्स्टेबल ठका बेलकर यांचाही समावेश होता. हल्ल्याच्या आधीच काही दिवस त्यांचे लग्न ठरले होते. कुटंबातील मंडळी त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. बेलकर यांनी रजेसाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांची रजा मंजूर झाली नव्हती. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांसोबत तेही या बसमधून निघाले होते. परंतु, बस सुटण्याआधी काही वेळ त्यांना मोबाईलवर रजा मंजूर झाल्याचा मेसेज आला आणि ते बसमधून खाली उतरले. त्यानंतर काही वेळातच या बसवर हल्ला झाला. परंतु, काही वेळापूर्वी आलेल्या मेसेजमुळे बेलकर यांचे प्राण वाचले.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha