मुंबई : सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर दररोज कोणता ना कोणता ट्रेण्ड होत असतो, ज्यात सामान्यांपासून व्हीआयपी प्रत्येक जण सहभागी होतो. मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर #SareeTwitter या हॅशटॅगचा ट्रेण्ड सुरु आहे. या हॅशटॅगसह महिला साडीतील आपला फोटो शेअर करत आहे. याचा मोह राजकारणी महिलांनी आवरता आला नाही. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही आज (17 जुलै) सकाळी एक फोटो शेअर केला. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या दिवसातील आहे.

राजकारण्यांपासून सामान्यांपर्यंत मोहात पाडणाऱ्या #SareeTwitter ची सुरुवात कशी झाली?

हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शन लिहिलं की, 22 वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या पूजेतील सकाळचा फोटो." सोबतच त्यांनी #SareeTwitter या हॅशटॅगचाही वापर केला होता. प्रियांका गांधी यांचं लग्न 18 फेब्रुवारी 1997 रोजी बिझनेसमन रॉबर्ट वाड्रा यांच्याशी झाला होता.


हा फोटो पाहून अनेकांनी प्रियांका गांधींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.




मात्र यानंतर प्रियांका गांधींना ट्वीट करुन सांगावं लागलं की, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नाही. त्यांनी ट्वीट केलं की, शुभेच्छांसाठी आभार, पण एक जुना फोटो आहे. माझ्या लग्नाचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये आहे.