PM Modi Chennai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) यांनी तामिळनाडूसाठी 31,530 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या चेन्नई दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये 31,530 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यामध्ये रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून चेन्नई एग्मोरसह 5 रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई आणि बंगळुरू दरम्यान 262 किमी चौपदरी द्रुतगती मार्गाचे आज उद्घाटन केले. या महामार्गासाठी जवळपास 14872 कोटी रूपये खर्च येणार आहे. याशिवाय पंतप्रधानांनी दक्षिण रेल्वेच्या पाच रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. या प्रकल्पासाठी 1688 कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चापैकी चेन्नई एग्नोर स्टेशनसाठी 840 कोटी रुपये खर्च होणार आहे. चेन्नई एग्नोर स्टेशनची इमारत 114 वर्षे जुनी आहे. या इमारतीजवळच नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. नवीन इमारतीची रंगीत थीम हेरिटेज इमारतीसारखीच असेल. हे दक्षिण रेल्वेचे दुसरे सर्वात मोठे टर्मिनल असून हे रेल्वे स्थानक दिव्यांगांसाठी अनुकूल बनवण्यासह उपनगरीय, मेट्रो आणि एमआरटीएससाठी मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून काम करेल.    




पुनरुज्जीवन करण्यात येणाऱ्या या सर्व स्थानकांवर प्रगत प्रवासी सुविधा, वातावरण, सुंदर फ्रंट लँडस्केपिंग, विमानतळासारखी प्रकाश व्यवस्था आणि पार्किंग सुविधा असतील. शिवाय ये-जा करण्यासाठी स्वतंत्र कॉरिडॉरची व्यावस्था करण्यात येणार आहे. याबरोबरच विविध प्रकारची वाहने आणि पायी चालणाऱ्या प्रवशांसाठी वेगवेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. 


या स्टेशवर एस्केलेटर, लिफ्ट, जिने, स्कायवॉक द्वारे सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवेश सुकर करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी वेटिंग रूम, अपंगांसाठी अनुकूल आधुनिक स्टेशन, ऊर्जा व्यवस्थापन उपाय, ट्रेन हाताळणी सुविधा आणि प्रवासी सुविधा यांचे विभाजन करण्यात येणार आहे.