मुंबई : इंधन दरवाढीची मालिका आजही सुरूच आहे. पेट्रोलचे दर आज 35 पैशांनी तर डिझेलचे दर 24 पैशांनी वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 89.02 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 78.06 रुपये पैशांनी मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे वाढते दर खाली येतील अशी उरली सुरलेली आशाही आता धुसर झाली.


पेट्रोलची नव्वदी पार
औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, सोलापूरमध्ये तर पेट्रोलच्या दरानं नव्वदी पार केली आहे. तर इतर शहरांतही दर नव्वदीकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याचं आहेत.


पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 10 सप्टेंबरला भारत बंद पुकारला होता. काँग्रेसच्या या आंदोलनाला जवळपास 21 राजकीय पक्षांना पाठिंबा दिला होता. मात्र इंधन दरवाढीवर या आंदोलनाचाही काही परिणाम झालेला नाही.


मुंबईत 15 दिवसात 2.93 पैशांनी महागलं
गेल्या 15 दिवसात पेट्रोल सातत्याने महागलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.02 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसात पेट्रोलच्या दरात 2 रुपये 93 पैशांची वाढ झाली आहे.


महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर


मुंबई
पेट्रोल- 89.02 रुपये
डिझेल-  78.06 रुपये


पुणे
पेट्रोल - 88.81 रुपये
डिझेल- 76.68 रुपये


गोंदिया
पेट्रोल - 90.08 रुपये
डिझेल- 77.92 रुपये


परभणी
पेट्रोल - 90.79 रुपये
डिझेल - 78.59 रुपये


अमरावती
पेट्रोल - 90.32 रुपये
डिझेल - 79..41 रुपये


नांदेड
पेट्रोल- 90.58 रुपये
डिझेल 78.40 रुपये


मनमाड
पेट्रोल-88.86 रुपये
डिझेल-76.73 रुपये


संबंधित बातम्या 

पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर! 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल  

इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ  

स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच  

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं