President in Sukhoi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या तेजपूर हवाई अड्ड्यावरुन सुखोई 30 MKI  (Sukhoi) या लढाऊ विमानाने उड्डाण केलं. यावेळी राष्ट्रपती हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या. भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं त्यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. तसेच सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची देखील माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सुखोई 30 MKI या लढाऊ विमानानं त्यांनी हिमाचल प्रदेशकडे उड्डाण केलं. 


भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेशवरून वाद सुरू आहे. अशातच राष्ट्रपती मुर्मू यांनी सुखोई लढाऊ विमानानं उड्डाण केलं आहे. या उड्डाणामुळे भारत हा ताकतवर देश असल्याचा संदेश जगासमोर गेला आहे. तेजपूर हवाईअड्डा चार देशांपासून भारताचे संरक्षण करतो. ज्यात चीन, म्यानमार, बांग्लादेश आणि भुटान या देशांचा समावेश होतो.






सुखोई 30 MKI लढाऊ विमान


एका मिनिटांत 57 हजार फुट उंचीपर्यंत उड्डाण भरण्याची क्षमता सुखोई 30 MKI या लढाऊ विमानात आहे. यात 30MM ची एक ग्रिजेव-शिपुनोव ऑटोकॅनन आहे. ज्याद्वारे एका मिनिटांत 150 राउंड फायर केलं जाऊ शकतं. सुखोई 30 MKI च्या हार्डपॉईंटमध्ये शस्त्रं ठेवण्याची अधिक सुविधा आहे. ज्यामुळे यात 14 शस्त्रं साठवली जाऊ शकतात. ज्यात ब्रह्मोस मिसाई देखील असू शकते. ताशी 1220 किमी वेगानं उडण्याची क्षमता या विमानात आहे. यापूर्वी माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनी देखील हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं. 


दरम्यान, गुरूवारी राष्ट्रपती मुर्मू या आमास येथे दाखल झाल्या. यावेळी आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया आणि मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा यांनी त्यांचं स्वागत केलं. आसामच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात फ्रिडा येथे 'गज उत्सवा'चे उद्घाटन केलं. तसेच आसाममध्ये आयोजित विविध कार्यक्रमांना देखील त्या उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी आज तेजपूर हवाई अड्ड्यावरुन सुखोई 30 MKI या लढाऊ विमानानं उड्डाण केलं आहे.   


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Coronavirus Updates: कोरोनाची लाट भयावह असणार? लॉकडाऊन लागणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं, वाचा सविस्तर