President Draupadi Murmu First Tweet : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च पद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी आज कारगिल दिवस असल्याने कारगिल युद्धातील शहीद शूर जवानांना अभिवादन करत पहिले ट्विट केले आहे. काय म्हणाल्या मुर्मू?
राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे पहिले ट्वीट
देश दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करतो. या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, "कारगिल विजय दिवस हा आपल्या सशस्त्र दलांच्या असामान्य शौर्याचे, पराक्रमाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर सैनिकांना मी नमन करते. तमाम देशवासी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सदैव ऋणी राहतील. जय हिंद!''
पंतप्रधानांनी केलं ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून कारगिल विजय दिवसाला श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये लिहिले की, "कारगिल विजय दिवस हे भारती मातेच्या अभिमानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रम गाजवणाऱ्या देशाच्या सर्व शूर सुपुत्रांना मी या निमित्ताने सलाम करतो. जय हिंद!''
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांचे पत्र
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, "कारगिल विजय दिवसानिमित्त, देश आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला सलाम करतो. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत धैर्याने लढा दिला. त्यांचे शौर्य भारताच्या इतिहासात नेहमीच एक निर्णायक क्षण म्हणून कोरले जाईल. गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "कारगिल विजय दिवस हे भारतीय सशस्त्र दलाच्या साहस आणि शौर्याचे प्रतीक आहे. आजचा दिवस अभिमान बाळगण्याचा तसेच आपल्या सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करण्याचा आणि सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यांच्या शौर्याने कारगिलमधून शत्रूंना हुसकावून लावणार्या सैनिकांना मी सलाम करतो.