अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. अहमदाबाद विमानतळावरून ट्रम्प यांचा ताफा थेट साबरमती आश्रमाकडे गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांचं आश्रमता स्वागत केलं. त्यानंतर शॉल देऊन ट्रम्प आणि त्यांची पत्नी यांचा सन्मान केला. त्यानंतर मोदींनी त्यांना आश्रम दाखवला. आश्रमात ट्रम्प यांनी महात्मा गांधीजींचा चरखादेखील चालवला. तसेच मोदींनी त्यावेळी चरख्याशी संबंधित इतिहासाबाबत त्यांना माहिती दिली.
चरखा पाहून हैराण झाले ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प चरखा पाहून हैराण झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना चरखा कसा चालवायचा? याबाबत माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आश्रमातील लोकांना त्यांच्या मदतीसाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर ट्रम्प यांनी गांधीजींच्या तीन माकडांना पाहिलं. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना या माकडांबाबत सांगितलं.
या अप्रतिम दौऱ्यासाठी धन्यवाद
आश्रमातून निघताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिप्राय पुस्तिकेमध्ये संदेश लिहिला. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिलं. त्यांनी लिहिलं की, ''माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी... धन्यवाद, अप्रतिम भेट!' परंतु, त्यांनी अभिप्राय पुस्तिकेत महात्मा गांधींबाबत काहीच लिहिलं नाही.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जनसभाही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमध्ये ही सभा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया सोबत अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे जाणार आहेत.
संबंधित बातम्या :
Namastey Trump LIVE UPDATES | पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेत : डोनाल्ड ट्रम्प