डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याआधी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
एबीपी माझा वेब टीम | 24 Feb 2020 12:49 PM (IST)
ट्रम्प यांच्या या दौऱ्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात मोठे व्यापारी करार होण्याची शक्यता आहे. या दोऱ्याआधीच बाजारात सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौऱ्यावर येत आहे. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याआधी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बीएसईचा 30 शेअरचा सेन्सेक्स 133 अकांनी गडगडत 41,037 अंकांनी सुरु झाला. तर निफ्टीमध्ये 68 अकांची घसरण होऊन 12,012 अंकांनी सुरू झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी 9.30 वाजता 472.18 अकांनी सुरुवात होत 1.15 अकांनी घसरण होतं 40,697.94 वर पोहोचला. तर 50 शेअर्सचा निफ्टी 145.80 अंकांनी म्हणजे 1.21 अंकांनी घसरण होतं 11,935.05 वर पोहोचला. कोरोना व्हायरस चीनच्या बाहेर पसरल्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये घसरण झाली आहे. भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सहकुटुंब भारतात झाले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलं होतं. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते 22 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत आणि मोटेरा क्रिकेट स्टेडियममधील 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात मोदींसोबत जनसभेला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत. याचसोबत डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमालाही भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात मोठे व्यापारी करार होण्याची शक्यता आहे. TOP 50 | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा | बातम्यांचं अर्धशतक | ABP Majha