नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे अधिवेशन एक आठवडा आधीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सर्वच पक्षांच्या खासदारांचे कोरोनाची परिस्थिती पाहता अधिवेशन लवकर उरकण्यावर एकमत झालं आहे. एक ऑक्टोबरपर्यंत अधिवेशन घेण्याचा सरकारचा मानस होता. मात्र, आता हे अधिवेशन लवकर उरकण्याची शक्यता आहे.
सरकारची महत्वाची कामं पूर्ण झाल्यानंतर संसदेचे कामकाज संपवण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार संसदेचे अधिवेशन एक आठवडा आधीच संपण्याची शक्यता आहे. कोरोना काळात काढलेल्या 11 अध्यादेशांना संसदेत मंजूर करुन घेण्यावर सरकारची प्राथमिकता आहे. यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित तीन महत्वाचे अध्यादेश आहेत, ज्याविरोधात अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार मधील एका महिला मंत्र्याने राजीनामाही दिलाय. एकूण 11 अध्यादेशांपैकी 7 लोकसभा आणि 4 राज्यसभेमध्ये मंजुर झाले आहेत.
या महत्वाच्या विधेयकांमध्ये कामगार आणि मजुरांशी संबंधीत तीन आहेत. आज लोकसभेत सादर केल्या गेलेली तीन विधेयकं मंगळवारी पारीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती राज्यसभेत पारीत करण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त जम्मू कश्मीर आधीकरिक भाषा बिल आणि परदेश देणगी ( नियामक ) संशोधन बिल देखील सरकार पारित करु इच्छिते.
14 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशाना दरम्यान आतापर्यंत एकूण 162 व्यक्ती कोरोनाने संक्रमित झाले आहेत. यात 30 खासदारांव्यतिरिक्त संसदेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत लोकसभेतील दोन आणइ राज्यसभेच्या एक खासदाराचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोन कॅबिनेट मंत्रीही कोरोनाने संक्रमित झाले आहेत. देशभरात रोज जवळपास 90 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोद होत आहे.
महत्वाच्या बातम्या
रावसाहेब दानवेंची शरद पवार-संजय राऊत भेट चर्चेत, दानवे म्हणाले...
कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट? केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा
सीमेवरील 26 हजार टन कांदा निर्यातीला परवानगी, येत्या 3-4 दिवसांत चांगला निर्णय येईल : सुभाष भामरे