नवी दिल्ली : कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं आहे. मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला आहे. त्यांनी आज (17 सप्टेंबर) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत ट्वीट करुन माहिती दिली. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.


हरसिमरत कौर यांचे ट्वीट..
हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करत म्हटलं, “मी शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्यांचा विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि बहिण म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिल्याचा मला अभिमान आहे.” जर सरकारने आज शेतकरी विरोधी विधयेक मांडली तर अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री आपला राजीनामा देतील, असे सुखबीर बादल लोकसभेत बोलले होते.





तीन कृषी विधेयकं शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विधेयकाविरोधात पंजाब हरियाणा राज्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कौर मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या असल्या तरी अकाली दलाचे केंद्र सरकारला समर्थन कायम राहणार आहे. बादल म्हणाले, “शिरोमणी अकाली दल या विधेयकाचा तीव्र विरोध करते. देशासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रत्येक विधेयकाचे देशातील काही लोक समर्थन करतात तर काही त्याला विरोध करतो. सरकारच्या नव्याने येणाऱ्या 3 कायद्यांचा पंजाबमधील 20 लाख शेतकऱ्यांवर प्रभाव पडणार आहे. 30 हजार आडते, कृषी बाजारातील 3 लाख मजूर आणि 20 लाख शेतीतील मजूरांवर याचा दुष्परिणाम होणार आहे.”


महत्वाच्या बातमी :


काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना अनोख्या शुभेच्छा, साजरा केला राष्ट्रीय बेरोजगारी दिन


Harsimran Kaur Badal Resigned | अकाली दलाच्या हरसिमरन कौर मंत्रिमंडळातून बाहेर, मंत्रिपदाचा राजीनामा