Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेसची निवडणूक समितीत सहभागी होण्याची ऑफर नाकारली आहे. आता त्यांनी काँग्रेससोबतची बैठक आणि चर्चा न झाल्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मला काँग्रेसला जे सांगायचे होते ते मी सांगितले. त्यांनी माझे ऐकायचे की नाही ही त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे मी काँग्रेसमध्ये जायचे की नाही हे माझ्यावर अवलंबून आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांनी नुकतीत 'आज तक'ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तांनी म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाने 2014 नंतर मोठ्या स्तरावर नवीन शक्यता आणि पक्षाच्या रचनेवर चर्चा केली आहे. बहुतांश गोष्टींवर आमचे एकमत झाले, पुढे काय करायचे यावरही एकमत झाले. ते करण्यासाठी प्रशांत किशोरची त्यांना गरज नाही. संभाषणात नेत्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेसने समितीत सहभागी होण्याबाबत विचारले, परंतु मी त्यास नकार दिला.
प्रशांत किशोर म्हणाले, "ते माझे शब्द कसे घेतात हे काँग्रेसवर अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये एवढे मोठे नेते आहेत की ते स्वत: पण नियोजन करू शकतात. G-23 नेत्यांमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. सूचनांबाबत चर्चेत एकमत झाले. माझी उंची इतकी नाही की राहुल गांधीनी मला किंमत द्यावी. राहुल गांधी माझे मित्र आहेत. राहुल गांधी अनेकवेळा बैठकीत होते. परंतु, स्थापन करण्यात आलेल्या समितीत राहुल गांधी नव्हते.
"नेतृत्वबाबत तयार करण्यात आलेल्या फॉर्म्यु्ल्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे नाव नव्हते. राहुल गांधींची भूमिका ठरवण्याइतकी ताकद माझ्याकडे नाही. काँग्रेसने माझे आभार मानले, मला यात काही अडचण नाही. जर त्यांना वाटत असेल की ते माझ्याशिवाय करू शकतात, तर त्याला काही हरकत नाही. मी माझ्या प्रेझेंटेशनसाठी पैसे घेतले नाहीत, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या