Power Crisis : सध्या देशातील अनेक भागात विजेचं संकट निर्माण झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोळशाचा मोठा तुटवडा भासत आहे. दरम्यान, वीज केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा लक्षात घेता रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांना प्रवासी गाड्यांच्या आधी ग्रीन सिग्नल देण्याचे निर्देश दिले आहेत.


दरम्यान, देशात सध्य विजेची समस्या निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन सुरु करण्यात आले आहे. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील भारनियमनाचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. कोळशाचा तुटवडा झाल्याने विजेची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने कोळसा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 28 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून 8 पॅसेंजर गाड्याही पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, विजेच्या संकटाच्या मुद्यावरुन विरोधक मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये केवळ 7 दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. फेसबुकवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, भारतात विजेचा तुटवडा भासत आहे, सर्वसामान्यांना 8 तास वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत इशारा दिला होता असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे कोळशाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, 106 पैकी 105 कोळसा प्रकल्प कोळशाच्या साठ्याच्या बाबतीत गंभीर स्थितीत आहेत. त्यामध्ये 25 टक्क्यांपेक्षाही कमी साठा शिल्लक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.


केवळ चारच तास वीजपुरवठा : अखिलेश यादव


समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील विजेच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. गावांमध्ये 20 तास वीजपुरवठी होत असल्याचा दावा केला जात आहे, मात्र, केवळ 4 तास वीजपुरवठा होत असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. वीज खंडित झाल्यामुळे यूपीमधील गावागावांमध्ये परीक्षार्थींमध्ये नाराजी वाढत आहे. घरातील वृद्ध आणि महिला उष्णतेमुळे हैराण आहेत. तसेच वीज खंडित झाल्यामुळे रुग्णालयातील आजारी लोक, तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत आहे. दुकाने आणि कारखान्यांवरही वीज नसल्यामुळे परिणाम जाला आहे. त्यामुळे भाजप सरकारने उत्तर प्रदेशसाटी वीज खरेदी करावी अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: