मुंबई : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात (2017) देशात खड्ड्यांमुळे तीन हजार 597 जणांना प्राण गमवावे लागले. यापैकी महाराष्ट्रातील 726 जणांचा समावेश आहे.
2016 च्या तुलनेत गेल्या वर्षी 'खड्डेबळीं'च्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2017 मध्ये तीन हजार 597 जणांनी खड्ड्यांमुळे जीव गमावले. म्हणजेच सरासरी
महाराष्ट्रातही 2016 च्या तुलनेत खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या दुपटीवर पोहचली आहे. राज्यात 2017 साली 726 जण मृत्युमुखी पडले. राज्यभरात रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत असेलली हलगर्जी यातून अधोरेखित होत आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक (987) खड्डेबळी गेले आहेत.
दिल्ली आणि हरियाणामध्ये 2016 साली एकही खड्डेबळी नव्हता, मात्र गेल्या वर्षी हरियाणात तब्बल 522 जणांनी प्राण गमावले, तर दिल्ली आठ बळी गेले.
विशेष म्हणजे खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या देशभरात नक्षली हल्ल्यात प्राण गमावलेल्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी नक्षली हल्ल्यात 803 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुरक्षा दल अधिकारी आणि सामान्य नागरिक यांचा समावेश आहे.
रस्ते वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणं, दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालणं ही कारणं खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांचा मृत्यूदर वाढवतात, असं म्हटलं जातं.
रस्ते दुरुस्ती सुरु असलेल्या ठिकाणाजवळ झालेल्या अपघातात गेल्या वर्षी चार हजार 250 जण मृत्युमुखी पडले.