Brimato : वांग्याची भाजी आणि टोमॅटोचं सूप हे पदार्थ लोक आवडीने खातात. वांगी आणि टोमॅटो आवडणाऱ्या लोकांसाठी वाराणसीच्या वैज्ञानिकांनी एक भन्नाट फळभाजीच्या रोपाचा शोध लावला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद व्हेजिटेबल रिसर्च संस्थेच्या वैज्ञानिकांनी  (ICAR-IIVR) वाराणसीमध्ये वांगी आणि टोमॅटो दोन्ही देणार्‍या वनस्पतीची लागवड यशस्वीपणे केले आहे. वैज्ञानिकांनी त्याला 'ब्रिमॅटो’ असं नाव दिले आहे.  ब्रिंजल आणि टॉमॅटो ही नावं एकत्र करून या रोपाचे नाव तयार करण्यात आले आहे. 


‘ब्रिमॅटो’ च्या रोपामुळे  शहरी भागात, लहान जागेत आणि किचन गार्डनमध्ये अधिक भाज्यांची लागवड करता येईल. यामुळे मजूर, पाणी आणि रसायने इत्यादीवरील खर्च कमी होऊ शकतो. प्रत्येक ‘ब्रिमॅटो’ रोपातून 3-4 किलो वांगी आणि 2-3 किलो टोमॅटो मिळण्याचा अंदाज आहे. IIVR ने यापूर्वी ‘पोमॅटो’ नावाच्या रोपाचे कलम यशस्वीपणे लावले होते, ज्यातून बटाटे आणि टोमॅटो या दोन्ही भाज्या उगवल्या जाऊ शकतात.  ब्रिमॅटोचा विकास ड्युअल किंवा मल्टीपल ग्राफ्टिंगद्वारे करण्यात आला आहे.  यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त भाज्या तुम्ही एकाच रोपातून मिळवू शकता.   


ब्रिमॅटोचा विकास कसा झाला
ब्रिमॅटोमागील शास्त्रज्ञांनी  सांगितले की, की जेव्हा वांग्याची रोपे 25-30 दिवसांची आणि टोमॅटोची 22-25 दिवसांची होते तेव्हा त्यांना कलम करण्यात आले. ब्रिमॅटोच्या बाबतीत, कलम केल्यानंतर सुरूवातीच्या  5 ते 7  दिवसांमध्ये ही रोप नियंत्रित वातावरणात ठेवली गेली होती. सुरूवातीच्या  5 ते 7  दिवसांमध्ये रोपांना समप्रमाणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर ही रोपे 5 ते 7 दिवस सावलीमध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर ग्राफटिंग ऑपरेशनच्या 15 ते 18 दिवसांनंतर ग्राफटिंग रोपांचे शेतामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. 


Petrol-Diesel Price Today: सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, मुंबईत पेट्रोल 115 रुपयांच्या पुढे


आयसीएआर-आयआयव्हीआरचे संचालक डॉ.टी.के. बेहरा यांच्यानुसार, ब्रिमॅटो केवळ 10-11 रुपयांमध्ये आणि एक महिना कालावधीत विकसित केले जाऊ शकते. मोठ्या व्यावसायिक स्तरावर याचे रुपांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे रोपांची उपलब्धता किंमतही प्रति रोप 4-5 रुपये कमी होईल.


अरुणाचलमधील नदी काळवंडली, हजारो मासे मृत्यूमुखी; चीन कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा दावा