Petrol-Diesel Price Today: देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. लागोपाठ पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आज रविवारी पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 35 पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 109.34 रुपये झालं. तर डिझेल प्रति लीटर 98.07 रुपये झालं आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये विक्रम वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 109.34 रुपये झालं तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 106.23 रुपये झाली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 109.79 रुपये, तर डिझेलचे दर 101.19 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.25 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
इतर महत्वाच्या शहरात काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?
| शहर | पेट्रोल/प्रति लीटर |
डिझेल/प्रति लीटर |
| भोपाळ | 118.07 | 107.50 |
| रांची | 103.53 | 103.46 |
| बेंगळुरू | 113.15 | 104.09 |
| चंडीगढ़ | 105.22 | 97.77 |
| लखनौ | 106.24 | 98.54 |
| नोएडा | 106.46 | 98.73 |
| पाटना | 113.10 | 104.71 |
आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल-डिझेल दरवाढीनं उच्चांक गाठला आहे. महिनाभरात मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 6.82 रुपयांनी महागलं आहे. दोन ऑक्टोबर रोजी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 108.18 रुपये इतकी होती. आज मुंबईत पेट्रोलची किंमत 115 रुपयांच्या पुढे गेलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज 30 ते 40 पैशांनी वाढ होत आहे. दररोज वाढणाऱ्या इंधन दरवाढींमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. राज्यात पेट्रोल-डिझेलची सर्वाधिक किंमत परभणीमध्ये आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय?
| शहर | पेट्रोल/प्रति लीटर | डीजल/प्रति लीटर |
| पुणे | 114.58 | 104.05 |
| परभणी | 118.25 | 107.58 |
| नागपूर | 114.98 | 104.46 |
| औरंगाबाद | 115.94 | 105.35 |
| नाशिक | 114.64 | 104.09 |
| सातारा | 116.19 | 105.59 |
| सोलापूर | 115.65 | 105.09 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ? जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.