नवी दिल्ली : सर्वांसाठी सकारात्मक बातमी आली आहे. कोरोना विषाणू संसर्गावर सुरू असलेल्या लसीच्या संशोधनाला यश येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी आज दिली. कोरोना लसीच्या क्लिनीकल ट्रायल पूर्ण झाल्या असून आता मानवी चाचणी सुरू असल्याचेही चौबे यांनी सांगितले. या चाचण्या यशस्वी झाल्या तर संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
पीपी मॉडेलच्या मल्टीपल ब्लडसह आयजीजी अँटीबॉडी तपासणी मशीनद्वारे अवघ्या एका तासात रिझल्ट येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज पटना येथील एम्समध्ये फोन करुन कोरोनावरील लसी संदर्भात माहिती घेतली. यावेळी कोविड 19 रुग्णांची विचारपूसही त्यांनी केली. सोबतचं त्या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचीही माहिती घेतली.
पीपी मॉडेल वर विट्रोस ईसीआईक्यू (VITROS ECIQ) इम्यून डायग्नोस्टिक सिस्टम सँपल मशीन पटना येथील एम्स रुग्णालयात इंस्टॉल करण्यात येणार आहे. या मशीनमुळे आयजीजी अँटीबॉडी टेस्ट आणि 3100 विविध प्रकारच्या ब्लडची तपासणी होणार आहे. यामुळे एका तासामध्ये ब्लड टेस्टचा रिझल्ट मिळणार आहे. ज्यामुळे प्लाझ्मा थरेपी आणि इतर तपासणी वेगाने करण्यात मदत होणार आहे. एका आठवड्यात ही मशीन एम्समध्ये बसवण्यात येणार आहे.
लहान क्लिनिक आणि ब्लड बँकेसाठी ही मशीन उपयुक्त
लहान क्लिनिक आणि ब्लड बँकेसाठी ही मशीन उपयुक्त ठरणार आहे. काही महिन्यांपासून कोरोना लसीवर सुरू असलेल्या संशोधनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लसी यशासाठी आम्ही सर्वजण आशादायी असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी सांगितलं. या सर्वावर आयसीएमआरची पूर्ण टीम लक्ष ठेऊन आहे. मानवी चाचणी दोन टप्प्यात होणार आहे.
इराणमध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण : राष्ट्रपती हसन रुहानी
लसीच्या प्रगतीबाबत विस्तृत चर्चा
या दरम्यान सुरक्षा आणि स्क्रीनिंग वर विशेष भर दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी लसीच्या प्रगतीबाबत विस्तृत चर्चा केली आहे. यावेळी संशोधक प्रोत्साहनही दिल्याचं त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे म्हणाले, की बिहार सरकार आरोग्य मंत्रालयाला हवी ती मदत करायला तयार आहे. यापुढेही आवश्यक उपकरणे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले.
कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी बिहार सरकार मोठ्या उपाययोजना करत आहे. केंद्रीय पथक बिहारमध्ये येऊन सध्याच्या परिस्थितीची माहिती घेणार आहे. या पथकासोबत केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी चर्चा केली आहे. बिहारमध्ये सध्या 20 ते 25 हजार टेस्ट होत आहे.
BMC Commissioner Iqbal Chahal कोरोनामुक्तीसाठी 'स्पेशल 22' मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल माझावर