नवी दिल्ली : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तीन मार्चला मतमोजणी होईल.

मुख्य निवडणूक आयुक्त एके ज्योती यांनी ईशान्येकडील तीन राज्य - मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागांवर मतदान होणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर मतदानावेळी होणार आहे.

त्रिपुरामध्ये रविवारी 18 फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँडमध्ये मंगळवारी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तिन्ही राज्यांचे निकाल शनिवारी 3 मार्चला जाहीर होणार आहेत. निवडणुकांची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे.

पक्षीय बलाबल

मेघालय-

मुख्यमंत्री- मुकुल संगमा (काँग्रेस)

एकूण जागा - 60

काँग्रेस (24)
यूडीपी (7)
एचएसपीडीपी (4)
भाजप (2)
राष्ट्रवादी (2)
एनपीपी (2)
एनईएसडीपी (1)
अपक्ष (9)
रिक्त जागा (9)

त्रिपुरा-

मुख्यमंत्री- माणिक सरकार (माकप)

एकूण जागा- 60

सरकार (51)

माकप  (50)
भाकप (1)

विरोधी पक्ष (9)

भाजप (7)
काँग्रेस (2)

नागालँड-

मुख्यमंत्री- टी. आर. झेलिअँग (नागा पिपल्स फ्रंट)

एकूण जागा- 60

सरकार (50)

नागा पिपल्स फ्रंट (45)
भाजप (4)
जेडी(यू) (1)

विरोधीपक्ष (9)

राष्ट्रवादी (1)
अपक्ष (8)
रिक्त जागा (1)