नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजप आणि इतर 19 पक्षांना या वर्षी झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तब्बल 1100 कोटी रुपयांचा फंड मिळाला आहे. त्यामध्ये जवळपास 500 कोटी रुपयांचा फंड खर्च करण्यात आला आहे. हा खर्च स्टार प्रचारकांवर आणि निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या एका अहवालात हे सांगितलं आहे.
या वर्षी आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत 19 पक्षांना 1100 कोटी रुपयांचा फंड प्राप्त झाला. त्यामध्ये सर्वाधिक फंड हा भाजपच्या वाट्याला आला असन तो 611.69 कोटी रुपये इतका आहे. भाजपने यातील 252 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपने यापैकी 85.26 कोटी रुपये हे स्टार प्रचारकांवर खर्च केले आहेत तर 61.73 कोटी रुपये हे नेत्यांच्या यात्रेवर खर्च केले आहेत.
काँग्रेसला 193 कोटी रुपये
देशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 193.77 कोटी रुपये फंड मिळाला आहे. त्यापैकी पक्षाने 85.62 कोटी रुपये खर्चे केले. त्यामध्ये 31.45 कोटी रुपये प्रचारावर आणि 20.40 कोटी रुपये यात्रेवर खर्चे केले आहेत. फंड मिळवण्याबाबत द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांचा तिसरा क्रमांक असून या पक्षाला 134 कोटी रपये मिळाले आहेत. तर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला 56.32 कोटी रुपये मिळाले आहेत. तर मोकपला त्यापेक्षा जास्त म्हणजे 79.24 कोटी रुपये फंड म्हणून मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Electoral Bonds च्या माध्यमातून शिवसेनेला मिळाले 111 कोटी रुपये, जाणून घ्या दहा प्रमुख प्रादेशिक पक्षांचे इनकम
- Electoral bonds : भाजप मालामाल! इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाला 74 टक्के निधी, काँग्रेसला केवळ 9 टक्के
- इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित माहिती गोपनीय, ती सार्वजनिक करता येणार नाही: केंद्रीय माहिती आयोग