Drug Peddler : एक नोव्हेंबर रोजी केरळमध्ये दोन मॉडलचा अपघाती मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचं समोर आलेय. एक नोव्हेंबर रोजी मिस केरळ 2019 आणि मिस केरळ 2019 उपविजेतीचा पहाटे अपघातामध्ये मृत्यू झाला होता. कोचीमधील व्हिटिला-पलारीवट्टोम बायपासवर कार अपघातात यांचा मृत्यू झाला. मिस केरळ 2019 आणि मिस साउथ इंडिया 2021 चे विजेतेपद पटकावणारी अन्सी कबीर आणि मिस केरळ 2019 ची उपविजेती अंजना शाजन यांचा अपघात झाला होता. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आणि झाडावर आदळल्याने जागीच मृत्यू झाल्याच प्राथमिक तपासातून समोर आलं होतं. मात्र, ड्रग्ज पेडलर दुचाकीने पाठलाग करत होता, त्याला हुलकावणी देत असताना हा अपघात झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.


अन्सी कबीर आणि अंजना शाजन यांचा ड्रग्ज पेडलर पाठलाग करत होता. ड्रग्ज पेडलरला चकावा देताना यांचा अपघाती मृत्यू झाला. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे सगळा प्रसंग घडला होता. कोचीचे पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसा ड्रग्ज पेडलर सॅजू थंकाचन याने मॉडेलच्या कारचा पाठलाग केला होता. ड्रग्ज पेडलरच्या पाठलागामुळे मिस केरळ अन्सी कबीर आणि उपविजेती अंजना शाजन यांचा अपघातात मृत्यू झाला. ते पुढे म्हणाले की, "ड्रग्ज पेडलरने पाठलाग केल्यामुळे मॉडेलला गाडी वेगाने पळवावी लागली आणि त्यामुळे अपघात झाला, आमच्या तपासातून असं दिसून आलं आहे. एका पार्टीनंतर थंकाचनने त्या मॉडेलसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. विरोध केल्यामुळे ड्रग्ज पेडलरने अन्सीच्या गाडीचा पाठलाग केला, असं पोलीस आयुक्त नागराजू म्हणाले."  मंगळवारी विशेष तपास पथकाने याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला. ड्रग्ज पेडलरने पाठलाग केला नसता तर कदाचीत अपघात झाला नसता, असं न्यायालयात सादर करण्यात आलेल्य अहवालात म्हटलेय. या अहवालानंतर न्यायालयाने आरोपी थंकाचन याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर थंकाचन याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.


थंकाचन हा ड्रग्ज व्यसनी असून अनेक गैरव्यवहारांमध्ये सामील आहे. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पार्टीनंतर थंकाचन अनेक मुलींची छेड काढल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्याविषयी अधिक माहिती समोर आली तर आम्ही आणखी गुन्हे दाखल करू. आम्ही त्याच्याविरुद्ध कलम 506, 299 आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत, असं पोलीस आयुक्त नागराजू म्हणाले.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



संबधित बातम्या :


Miss Kerala 2019 सौंदर्यवतींचा अपघाती मृत्यू,विजेती Ansi Kabir ,उपविजेती Anjana Shajan दोघींचा मृत्यू