चंदीगड : 127 खटल्यांमधील आरोपी असलेला 77 वर्षीय 'नटवरलाल'ला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब-हरियाणा हायकोर्टातील वकिलाच्या कार चोरी प्रकरणात अखेर हा 'नटवरलाल' पोलिसांच्या हातील लागला. धनीराम मित्तल असे या 'नटवरलाल'चं खरं नाव आहे.


 

 

डीसीपी वेस्ट पुष्पेंद्र कुमार यांच्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राजपाल डबास यांच्या पोलीस पथकाने धनीराम मित्तलला अटक केली आहे.

 

 

धनीराम हा मूळचा हरियाणातील भिवानीचा रहिवाशी आहे. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 1968 ते 1974 या कालावधीत धनीराम बनावट कागदपत्र तयार करुन रेल्वेमध्ये स्टेशन मास्तरच्या पदावर काम करु लागला. त्यानंतर तो रोहतकमधील आरटीओ ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बनवू लागला. गाड्यांचे बनावट कागदपत्र तयार करण्याच्या प्रकरणात धनीराम 1964 साली पहिल्यांदा तुरुंगवारी करुन आला.

 

 

त्यानंतर धनीरामची तुरुंगवारी कायम सुरुच राहिली. एलएलबी उत्तीर्ण झाल्यानंतर बनावट कागदपत्र आणि संबंधितांची फसवणूक करत झज्जर कोर्टात मॅजिस्ट्रेट म्हणून रुजू झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने फसवणुकींच्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनाही बेजार केलं होतं.

 

 

हरियाणा, दिल्ली, पंजाब, चंदीगड आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये धनीरामविरोधात तब्बल 127 तक्रार दाखल आहेत.

 

 

डीसीपीने दिलेल्या माहितीनुसार, धनीरामला रोहिणी कोर्टाच्या परिसरात अटक करण्यात आलं. त्याच्याकडून राणी बागेतून चोरी केलीली एक कारही जप्त करण्यात आली आहे. चंदीगड पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वीच फरार म्हणून घोषित केलं होतं.