नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील आणि जगभरात पसरलेल्या बंगाली समुदायाला बंगाली नववर्षाच्या म्हणजे पोइला बोइशाखच्या शुभेच्छा दिल्या. बंगाली नववर्षाच्या निमित्ताने त्यांनी बंगाली जनतेच्या उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभावी अशा शुभेच्छा दिल्या. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडियावरून हा संदेश दिला असून त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "बंगाली लोकांचे प्रेम आणि उत्साह मनाला भावतो. भारतात आणि जगभरात पसरलेल्या बंगाली जनतेला पोइला बोइशाखच्या शुभेच्छा! नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचं जावो."


 






वैशाख महिन्याचा पहिला दिवस बंगाली समुदायासाठी खास असतो. या दिवशी पोइला बोइशाख अर्थात बंगाली नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस बंगाली जनतेत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. 


बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बंगाली भाषेत पोइला बोइशाखच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


 




कसं साजरा केला जातो पोइला बोइशाख?
पोइला बोइशाख हा सण दरवर्षी 14 किंवा 15 एप्रिलला साजरा केला जातो.  या वर्षी तो 15 एप्रिलला साजरा करण्यात येत आहे. पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारतातील बंगाली समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातोय. 


आजच्या दिवशी बंगाली समुदायाचे लोक नवीन कपडे परिधान करतात, पूजा-पाठ करतात. आजच्या दिवसापासूनच बंगाली व्यापारी आपल्या व्यापाराचा लेखा-जोगा सुरू करतात. आजच्या दिवशी बंगाली घरामध्ये गोड-धोड जेवण तयार केलं जातं आणि सर्व कुटुंब त्याचा अस्वाद घेतं. 



महत्वाच्या बातम्या :