Bangladesh First Metro Rail : बांगलादेशाची (Bangladesh) राजधानी ढाका येथे पंतप्रधान शेख हसीना (PM Shaikh Hasina) यांनी देशातील पहिल्या मेट्रो रेल्वेला (Metro Railway) हिरवा झेंडा दाखवला. ढाक्यातील पहिली मेट्रो राइड दियाबारी ते आगरगाव स्टेशन दरम्यान सुरू करण्यात आली आहे. माहितीनुसार, बांगलादेशच्या महत्त्वाकांक्षी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा एक भाग आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



बांगलादेशात पहिली मेट्रो रेल्वे सेवा सुरू
बांगलादेशाची राजधानी ढाका येथे बुधवारी पहिली मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. पंतप्रधान शेख हसीना यांनी हिरवी झेंडी दाखवून मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले. त्या म्हणाल्या, "आश्वासन दिल्याप्रमाणे, बांगलादेशात पहिली मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे  वाहतूक कोंडीची समस्या देखील लवकरच दूर होईल. हे 6 मेट्रो रेल्वे मार्ग  ते करण्यास मदत करतील," असं त्या म्हणाल्या. दरम्यान, वृत्तसंस्था AP ने सांगितले की, जपानने बांगलादेशातील या मेट्रो सेवेसाठी निधी दिला आहे. यासोबतच नवनियुक्त जपानचे राजदूत किमिनोरी इवामा आणि इचिगुची तोमोहाइड हे उपस्थित होते.


 


 




 



त्या सहा जपानी इंजिनिअर्सची आठवण
मेट्रो सेवेचे उद्घाटन करताना पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, आज आपण आपल्या देशातील लोकांसाठी आणखी एक कामगिरी केली आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान मारल्या गेलेल्या सहा जपानी इंजिनिअर्सची आठवण केली. 2016 मध्ये ढाका येथील एका कॅफेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या इंजिनिअर्सची हत्या झाली होती. या हल्ल्यात एकूण 29 लोक मारले गेले. उल्लेखनीय आहे की, जूनमध्ये पंतप्रधान हसिना यांनी पद्मा नदीवरील 6.51 किमी (4.04-मैल) पुलाचे उद्घाटन केले होते. हा पूल चीनने सुमारे $3.6 अब्ज खर्च करून बांधला आणि त्यासाठी देशांतर्गत निधीतून पैसे दिले.


 


रिपोर्ट काय सांगतात?
रिपोर्टनुसार, जेव्हा ही मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा एका तासाच्या आत दर तासाला 60,000 हून अधिक लोकांची वाहतूक करू शकेल. उद्घाटन कार्यक्रमादरम्यान, जपानी राजदूताने बांगलादेश आणि जपान यांच्यातील दीर्घकालीन संबंधांबद्दल बोलले. भविष्यात संबंधांना प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता देखील अधोरेखित केली.