नवी दिल्ली : आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्यात श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या भूमीपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी 40 किलो चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विटेचा उपयोग अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पायाभरणीसाठी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यानंतर ही वीट लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहे.
मणि राम दास छावनी पीठने 40 किलोच्या चांदीच्या विटा दिल्या
असं सांगितलं जात आहे की, महंत नृत्य गोपाळ दास यांनी मणि राम दास छावनी पीठ यांच्यातर्फे राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी 40 किलोची चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. महंत कमल नयन दास, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दासचे उत्तराधिकारी आहेत. मणि राम दास छावनी पीठ हे महंत नृत्य गोपाल दास यांचं निवास स्थान आहे. अयोध्येतील सर्व प्रमुख धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा याच ठिकाणाहून आखण्यात येते.
पाहा व्हिडीओ : प्रभू रामाच्या अयोध्यानगरीत दिवाळी, ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्या सजली!
महंत नृत्य गोपाळ दास यांचं म्हणणं आहे की, राम मंदिराच्या पायाभरणीत चांदीच्या विटा वापरण्यात काही अर्थ नाही. भूमीपूजनानंतर त्यांना काढून स्टेट बँक ऑफ इंडियामधील ट्रस्टच्या बँक लॉकरमध्ये ठेवले जाईल. दास यांनी पुढे बोलताना सांगितले की, त्यानंतर या विटा मोडीत काढून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग राम मंदिर उभारण्यासाठी मदत म्हणून करण्यात येईल.
Ram Mandir Bhumi Pujan LIVE | राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली
मंदिर निर्माण करण्यासाठी ट्रस्टकडे आल्या अनेक चांदीच्या विटा
महंत नृत्य गोपाल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टच्या नावे चांदीच्या विटा दान केल्या आहेत. या सर्व विटांचा बुधवारी भूमीपुजनाच्या सोहळ्यात वापर करण्यात येईल. तसेच आयोजन संपल्यानंतर त्या लॉकरमध्ये ठेवण्यात येतील. दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशभरातून अनेकांनी चांदीच्या विटा पाठवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'बाबरी मस्जिद होती आणि राहील'; राम मंदिर भूमिपूजनाआधी असदुद्दीन ओवैसींचं ट्वीट
- माझ्या हृदयाच्या जवळचं स्वप्न पूर्ण होतंय : लालकृष्ण अडवाणी
- राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त काढून दिलेले पंडित शर्मा यांना धमक्यांचे फोन
- कारसेवकांची जी इच्छा, त्याप्रमाणे भव्य मंदीर साकारलं जात नाहीये : शिवसैनिक संतोष दुबे
- राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह 'हे' पाच जण!