लखनौ : अयोध्या राममंदिर भूमीपूजन सोहळ्याला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. भूमिपूजन भव्य आणि ऐतिहासिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या भूमीपूजनासाठी 176 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या 175 लोकांमध्ये विविध पंथांसह अनेक मोठ्या सामाजिक आणि राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. पण असे काही लोक आहेत जे पूजेमध्ये भाग घेणार नाहीत. यापैकी बहुतेक लोकांनी कोरोना संसर्गापासून सावधगिरी म्हणून पूजेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे.
भूमीपूजन सोहळ्यात हे लोक सामील होणार नाहीत
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि खजिनदार गोविंद देव गिरी यांनी या आमंत्रणाची पुष्टी केली. लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे राम मंदिर आंदोलन यशस्वी झाले आहे, हे सांगायला चंपत राय विसरले नाहीत. वय जास्त असल्यामुळे आणि पाहुण्यांच्या मर्यादित संख्येमुळे या ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही, असंही त्यांनी सांगितलं. मात्र तिन्ही नेत्यांशी फोनवर चर्चा झाल्याचे चंपत राय यांनी सांगितलं.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारतीही पूजा कार्यक्रमात भाग घेणार नाहीत. त्याला आमंत्रण पाठवण्यात आले होते पण उमा भारती यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कार्यक्रमातून त्या दूर राहणार आहेत. उमा भारती यांनी याबाबत ट्वीटही केलं आहे. उमा भारती कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत, मात्र कार्यक्रम संपल्यानंतर त्या रामललाचं दर्शन घेणार आहेत. यासाठी त्या आज अयोध्येत पोहोचणार आहेत.
प्रयागराजचे स्वामी वासुदेवानंद महाराज देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौमासा नक्षत्रामुळे स्वामी वासुदेवानंद महाराज आपले सिंहासन सोडू शकत नाहीत. तथापि, ट्रस्टने त्यांना आमंत्रित केले आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य के.परासरण भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. परासरण न्यायालयात राम मंदिराच्या बाजूचे वकील देखील होते. जास्त वयामुळे ते चेन्नईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भूमिपूजनात सामील होतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राम मंदिर भूमीपूजनामध्ये भाग घेता येणार नाही. 2 ऑगस्ट रोजी, अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. अमित शाह हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत.
संबंधित बातम्या