Ram Mandir Bhumi Pujan LIVE | पंतप्रधान मोदी निवासस्थानाहून अयोध्येसाठी रवाना

Ram Mandir Bhumi Pujan LIVE | ऐतिहासिक राममंदिराच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2020 09:32 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निवासस्थानाहून अयोध्येला जाण्यासाठी रवाना, नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी राम मंदिराची पायाभरणी करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निवासस्थानाहून अयोध्येला जाण्यासाठी रवाना, नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी राम मंदिराची पायाभरणी करणार
प्रभू रामललाला हिरव्या आणि भगव्या रंगाची वस्त्र परिधान करण्यात आली आहेत. याचे एक्सक्लुसिव्ह फोटो एबीपी माझाकडे...
प्रभू रामललाला हिरव्या आणि भगव्या रंगाची वस्त्र परिधान करण्यात आली आहेत. याचे एक्सक्लुसिव्ह फोटो एबीपी माझाकडे...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याआधी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या ट्वीटचा उल्लेख केला आहे.


नाशिकच्या पुरोहित, साधू महंताना पोलिसांची नोटीस, रात्री उशीरा दिल्या नोटीस, राम मंदिर भूमीपूजनाचे कार्यक्रम न करण्याचे आदेश अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याच्या सूचना, गर्दी झाल्यास जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करणार, गोदा काठावर होणार होते जलपूजन आणि राम पादुका आणि स्तंभ पूजन, राम भूमी म्हणून नाशिकची ओळख
आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्यात श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या भूमीपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी 40 किलो चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विटेचा उपयोग अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पायाभरणीसाठी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यानंतर ही वीट लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहे.
सध्या हनुमानगढी येथील काही दृश्य समोर आली आहेत. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याआधी सॅनिटायजेशन करण्यात येत आहे.

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी अशी तयारी करण्यात आली आहे. शरयू तीरावरती सुंदर सजावट करण्यात आली आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सकाळी ट्वीट करत म्हटलं की, "बाबरी मशिद होती आणि राहिल. इशांअल्लाह.''

राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी मंदिराची पायभरणी होणार, परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि खजिनदार गोविंद देव गिरी यांनी या आमंत्रणाची पुष्टी केली. लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे राम मंदिर आंदोलन यशस्वी झाले आहे, हे सांगायला चंपत राय विसरले नाहीत. वय जास्त असल्यामुळे आणि पाहुण्यांच्या मर्यादित संख्येमुळे या ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही, असंही त्यांनी सांगितलं. मात्र तिन्ही नेत्यांशी फोनवर चर्चा झाल्याचे चंपत राय यांनी सांगितलं.
आज अयोध्या येथे राममंदिर भूमीपूजन सोहळा. भूमिपूजन भव्य आणि ऐतिहासिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या भूमीपूजनासाठी 176 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या 175 लोकांमध्ये विविध पंथांसह अनेक मोठ्या सामाजिक आणि राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. पण असे काही लोक आहेत जे पूजेमध्ये भाग घेणार नाहीत. यापैकी बहुतेक लोकांनी कोरोना संसर्गापासून सावधगिरी म्हणून पूजेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे.
अयोध्येतील राममंदिर भूमीपूजनाला काही तास उरलेले असताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया आली आहे. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न पूर्ण होत आहे, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. राममंदिर आंदोलनातील लालकृष्ण अडवाणी प्रमुख चेहरा होते. लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं की, जीवनात काही स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न होतं, ते पूर्ण होत आहे. अयोध्या येथे राम जन्मभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. निश्चित हे माझ्याच नाही देशातील करोडो लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. श्री रामजन्मभूमी येथे भव्य राम मंदिर बांधणे हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आणि मिशन आहे. भाजपने मला 1990 मध्ये रामजन्मभूमी चळवळीच्या वेळी सोमनाथ ते अयोध्या या रथ यात्रेची जबाबदारी दिली होती. या प्रवासाने असंख्य लोकांच्या आकांक्षा, ऊर्जा प्रेरित केल्या. याप्रसंगी राम मंदिर चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या, बलिदान देणाऱ्या, सर्व संतांचे, नेत्यांची आणि लोकांची मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं.
ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील. परंतु सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लाऊन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबादपर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचं अयोध्येत येतं आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विशेष अतिथिच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी प्रत्येक खुर्चीमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हँडग्लोज, मास्क आणि सँनिटायझर वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक ते सर्व सुरक्षेचे उपाय अयोध्येत करण्यात आले आहेत.


आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.

पार्श्वभूमी

अयोध्या : अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. अयोध्यानगरीत दाखल होताच भक्ताचं लक्ष विविध चित्र आणि होर्डिंगनं आकर्षित होत. संपूर्ण शहरात प्रभू श्री रामाच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळी कलाकृती साकरण्यात करण्यात आली आहे. अयोध्येतल्या अनेक भिंतीवर मोठमोठे चित्रही काढण्यात आली आहे.

अयोध्येच्या लोकांमध्ये उत्साह

आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.