PM Modi in UAE : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जर्मनीहून (Germany) संयुक्त अरब अमिरातीसाठी (UAE) रवाना झाले आहेत. युएईमध्ये पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीचे माजी राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त करतील. याशिवाय पंतप्रधान मोदी नवे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे शासक म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करतील. त्यानंतर 28 जून रोजीच रात्री पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीहून भारतासाठी रवाना होतील.


माजी राष्ट्रपतींच्या निधनावर शोक व्यक्त करणार
माजी राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचा13 मे रोजी मृत्यू झाला. 3 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. UAE आणि भारताचे संबंध चांगले आहेत. अशा स्थितीत या भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


मोहम्मद पैगंबरांविषयी वादानंतर मोदींचा यूएई दौरा महत्त्वाचा
पंतप्रधान मोदी यांचा युएई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा, दिल्ली भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. आखाती देशांसोबत भारताचे चांगले संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या दौरा भारत आणि युएईमधील संबंध अधिक चांगले होण्यासाठी महत्त्वाचा आहे.






पंतप्रधान मोदी G7 परिषदेत सहभागी


जर्मनीमध्ये G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जर्मनी दौऱ्यावर होते. परिषदेनंतर ते आता संयुक्त अमिरातीसाठी रवाना झाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या