PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरातमधील भुज येथील केके पटेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) याबाबातची माहिती दिली आहे. 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे. हे कच्छचे पहिले धर्मादाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हे रुग्णालय भुजच्या श्री कच्छी लेवा पटेल समाजाने बांधले आहे. या रुग्णालयात अत्यंत कमी खर्चात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर  18 एप्रिलपासून पंतप्रधान मोदी हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणार आहेत.


गुजरातमधील भुज येथे असलेले हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी (कॅथलॅब), कार्डिओथोरॅसिक सर्जरी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, न्यूक्लियर मेडिसिन, न्यूरो सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट या सुविधा देणार आहे. याशिवाय इतर सेवा जसे की प्रयोगशाळा, रेडिओलॉजी इत्यादी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासोबतच रुग्णालय परिसरातील लोकांना परवडणाऱ्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.


18 एप्रिलला पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18, 19 आणि 20 एप्रिलला तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान बनासकाठामध्ये तीन लाख महिलांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान 18 एप्रिलला  सायंकाळी साडपाच वाजता गुजरातमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान कमांड आणि कंट्रोल सेंटरला भेट देतील. 19 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी बनासकाठामधील गांधीनगर हेलिपॅड ते बनासदेरी या वेगळ्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करतील. तसेच तिथे ते महिला, शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: