Gunratna Sadavarte Satara Police Newsवकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण सध्या राज्यभरात त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात (satara police) दाखल गुन्ह्याबाबत चौकशी होत असताना आता कोल्हापुरात देखील आज गुन्हा दाखल होत असल्याची माहिती आहे.  सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी कालच कोल्हापूर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी भेट घेतली होती. आज कोल्हापुरात कुठल्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो. यासंदर्भात आज गृहमंत्री देखील भाष्य करु शकतात. 


सध्या गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. काल रात्री उशिरा त्यांना सातारा येथे आणलं गेलं. त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. ज्या ठिकाणी सदावर्ते यांना ठेवण्यात आलं आहे, त्याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचंही नाव असल्याची माहिती आहे. गावदेवी पोलिसांमध्ये दाखल गुन्ह्यात जयश्री पाटलांचंही नाव असल्याची सूत्रांची माहिती आहे.  


वकील गुणरत्न सदावर्ते यांना आता सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची सातारा पोलीस चौकशी करणार आहेत. शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण काल त्यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे. 


दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी  एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




संबंधित बातम्या :


शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण; ताब्यात घेतलेल्या दोघांमधील खळबळजनक संवादाची क्लिप हाती


Sharad Pawar Silver Oak Attack : सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा, राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा आरोप


Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्याची परवानगी


Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा वकील आज तिसऱ्यांदा बदलला, आज कोर्टात काय घडलं?