PM Modi Stops His convoy for Ambulance : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी आपला ताफा थांबवल्याचं समोर आलं आहे. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रुग्णवाहिकेसाठी आपला ताफा थांबवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आहे. यामध्ये एक रुग्णवाहिका जाताना दिसत आहे. ज्यावेळी रुग्णवाहिकाला रस्ता दिला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अहमदाबाद ते गांधीनगर या मार्गावर होता.  


 पाहा व्हायरल व्हीडिओ -






पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता गांधीनगर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगर ते कालुपूर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास केला. यादरम्यान ते लोकांशी बोलतानाही दिसले. मुंबईकरांसाठी पहिली वंदे भारत एक्सप्रेस शनिवारपासून नियमित रूपात सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट करत माहितीही दिली आहे.  










आणखी वाचा :


Vande Bharat Express : PM मोदींनी गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला दाखवला हिरवा झेंडा, मुंबईकरांसाठी शनिवारपासून सेवेत