नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाच तिथं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी अचानकच गुरुद्वारा शीसगंज साहेब येथे भेट दिली. गुरु तेग बहाद्दर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व च्या निमित्तानं पूजा करत या ठिकाणी श्रद्धासुमनं अर्पण केली. कोणताही सुरक्षा मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेशिवायच पंतप्रधानांनी या ठिकाणाला भेट दिली.


पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून मोदी ज्या वेळी गुरुद्वारामध्ये आले, त्यावेळी रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधही या ठिकाणी लावण्यात आले नव्हते. गुरुद्वारामध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गुरु तेग बहाद्दर यांनाही श्रद्धासुमनं अर्पण केली. 


Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 


खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण श्री शीशगंज साहेब गुरुद्वारा येथे भेट दिल्याचं सांगितलं. सोबतच काही छायाचित्रही त्यांनी पोस्ट केली.






मागील वर्षी केंद्रानं गुरु तेग बहाद्दर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाला धुमधडाक्यात साजरा करण्याचा मानस व्यक्त केला होता. प्रकाश पर्व हे एक राष्ट्रीय कर्तव्य असल्याचंही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं होतं.