PM Modi Mother Health Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraba Modi) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, हिराबेन यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दरम्यान, हिराबेन यांनी 18 जून रोजीच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.


हॉस्पिटलकडून मेडिकल बुलेटिन जारी
यूएन मेहता रुग्णालय व्यवस्थापनाने मेडिकल बुलेटिन जारी करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


 




 


 


 


 






 


गुजरातचे आरोग्यमंत्री पोहचले रुग्णालयात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतात. दरम्यान, गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयात पोहोचून हीराबेन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


रुग्णालयाची सुरक्षा वाढवली


हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रधान सचिव के कैलाशनाथन यूएन मेहता रुग्णालयात पोहोचले आहेत. यासोबतच असरवा आणि दरियापूरचे आमदारही रुग्णालयात पोहोचले आहेत.


 


पंतप्रधानांचे मातृप्रेम...!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या, नंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये ते हिराबेनचे आशीर्वाद घेताना दिसले. मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे. हे पाहता पंतप्रधानांचे मातृप्रेम स्पष्ट होते.


 


कोरोना काळात लोकांसमोर आदर्श निर्माण
कोरोनाच्या काळात जेव्हा लोक लस घ्यायला घाबरत होते. तेव्हा हिराबेन मोदींनी लस घेऊन लोकांसमोर आदर्श निर्माण केला होता. हिराबेनचे हे पाऊल पाहून समाजातील अनेक लोक लस घेण्यासाठी पुढे आले. एवढेच नाही तर त्या मतदान केंद्रावर जाऊन निवडणुकीत मतदानही करताना दिसल्या.