PM Modi Mann Ki Baat : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहेत. मन की बात (Mann Ki Baat) च्या माध्यमातून ते संवाद साधतील. मन की बातचा हा 92 वा एपिसोड आहे. सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
मन की बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी लोकांना आवाहन केले होते की, ते कार्यक्रमासाठीचे इनपुट शेअर करू शकतात.
जनतेकडून आलेल्या निवडक सूचना आणि कल्पनांचा समावेश
पीएम मोदीं त्यांच्या मन की बात या विशेष कार्यक्रमात जनतेकडून आलेल्या निवडक सूचना आणि कल्पनांचा समावेश करतील. हा विशेष भाग आज 28 ऑगस्ट रोजी प्रसारित होणार आहे. त्यामुळे तुम्हालाही पीएम मोदींना लोकांकडून आलेल्या काही सूचना किंवा संदेश आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी आज कच्छला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज कच्छला भेट देणार आहेत. रविवारी सकाळी 10 वाजता कच्छमध्ये 'स्मृती 'स्मृती वन स्मारक'चे उद्घाटन करणार आहेत. यानंतर श्यामजी सकाळी 11.30 वाजता कृष्ण वर्मा विद्यापीठाच्या मैदानावर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील आणि त्यानंतर दुपारी 2.30 वाजता अहमदाबाद विमानतळावरून राजभवनात परततील. सायंकाळी 5.30 वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिरात 'भारतातील सुझुकीची 40 वर्षे' स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
मागच्या वेळेस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संवाद
मागच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाबद्दल बोलत होते. पीएम मोदी म्हणाले होते, "यावेळची 'मन की बात' खूप खास आहे. याचे कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहे. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. 31 जुलै या दिवशी आपण सर्व देशवासियांनो, शहीद उधम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
संबंधित बातम्या