PM Modi Mann Ki Baat : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित केलं. मन की बातच्या माध्यमातून त्यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार या पार्श्वभूमीवर संवाद साधला. तसेच, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली. 


पंतप्रधानांच्या मन की बात मधील 10 महत्वाचे मुद्दे : 


1. मित्रांनो, 31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी, आपण सर्व देशबांधव, शाहिद उधम सिंह जी यांच्या हौताम्याला वंदन करतो. मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे.


2. माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एक विशेष मोहीम- “हर घर तिरंगा- हर घर तिरंगा” चे आयोजन केले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ आपण सर्वांनी, 13 ते 15 ऑगस्ट या काळात, आपल्या घरावर तिरंगा ध्वज जरूर फडकवा. किंवा आपल्या घरात लावा. तिरंगा आपल्याला एका सूत्रात जोडतो. आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो.


3. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी देशभरात 10 वी आणि 12वी इयत्तांचे निकाल देखील घोषित झाले आहेत. कठोर परिश्रम आणि एकाग्रतेसह या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो.


4. मित्रांनो, याच जुलै महिन्यात आणखी एक अतिशय रोचक प्रयत्न देखील करण्यात आला, ज्याचे नाव आहे- ‘आझादी की रेलगाडी और रेल्वे स्टेशन” या प्रयत्नाचे उद्दिष्ट आहे, स्वातंत्र्यलढ्यात भारतीय रेल्वेचे योगदान जाणून घेणे. देशांत अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत,जी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी संबंधित आहेत.


5. पुण्याची फनव्हेंशन लर्निंग ही कंपनी खेळणी तसेच अॅक्टिव्हीटी कोड्यांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या विषयांमध्ये मुलांची रुची वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.


6. मित्रांनो, आता - आता जुलै महिन्यात भारतीय आभासी हर्बेरियम सुरु करण्यात आलं आहे. हे उदाहरण आहे, की आपण कसा डिजिटल जगाचा उपयोग आपल्या मुळाशी जोडण्यात करू शकतो.


7. विदेशातून भारतात येणाऱ्या खेळण्यांची संख्या सतत कमी होत आहे. पूर्वी 3 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची खेळणी परदेशातून आयात होत असत, आता मात्र ही आयात 70%नी कमी झाली आहे. या काळात भारताने 2 हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या खेळण्यांची निर्यात केली आहे, पूर्वी केवळ 300-400 कोटी रुपयांची भारतीय खेळणी निर्यात होत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व घडामोड कोरोना काळात झाली आहे.


8. पुण्याची फनव्हेंशन लर्निंग ही कंपनी खेळणी तसेच अॅक्टिव्हीटी कोड्यांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या विषयांमध्ये मुलांची रुची वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.


9. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली आहे की, कोरोनाच्या काळात औषधी वनस्पतींवरील संशोधनात बरीच वाढ झाली आहे. याबाबत अनेक संशोधने प्रसिद्ध होत आहेत. ही एक नक्कीच चांगली सुरुवात आहे.


10. याच महिन्यात पी.व्हि.सिंधूने सिंगापूर खुल्या स्पर्धेत तिचे पहिले पारितोषिक मिळविले आहे. नीरज चोप्रा यानेदेखील अत्यंत उत्कृष्ट कामगिरी सुरु ठेवत जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Mann Ki Baat:'स्वातंत्र्याची 75 वर्षे होणार पूर्ण, 15 ऑगस्टपर्यंत DP वर तिरंगा ठेवावा' PM Modi 'मन की बात' मध्ये म्हणाले..