PM Modi Gujarat Visit : एकीकडे शेतकरी आंदोलन (Farmer Protest) तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा गुजरात (Gujarat) दौरा चर्चेत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या स्वगृही म्हणजेच गुजरातला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यात 44 हजार कोटी रुपयांहून अधिक विकासकामांची भेट देणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना देखील मोठी भेट देणार असल्याचं बोललं जातंय. 



गुजरातमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील वलीनाथ मंदिरातील अभिषेक समारंभ तसेच गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन ( Golden Jubilee of Gujarat Milk Federation) म्हणजेच अमूलच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारका येथील देशातील सर्वात लांब पूलाचे उद्घाटनही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या स्वागतासाठी राज्यात कडक सुरक्षा व्यवस्थेसह जोरदार तयारी करण्यात आली आहे. 



1.25 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना संबोधित करणार



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा गुजरातच्या विकासावर आधारित आहे. ते येथे GCMMF च्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला संबोधित करतील. अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे पंतप्रधान मोदी 1.25 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यानंतर, पंतप्रधान महेसाणा येथे भारत नेटच्या दुसऱ्या टप्प्यासह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील, जे 8000 हून अधिक ग्रामपंचायतींना हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करेल. पंतप्रधान हे खेडा, गांधीनगर, अहमदाबाद आणि महेसाणा येथील रस्ते प्रकल्प, रेल्वे मार्ग दुहेरीकरण, महेसाणा आणि बनासकांठा जिल्ह्यांमध्ये नवीन ब्रॉड-गेज मार्गांसाठी अनेक प्रकल्प, गांधीनगरमधील गुजरात बायोटेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक इमारतीसह बनासकांठामधील अनेक पाणीपुरवठा प्रकल्प आणि इतर अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.


 


केंद्रीय मंत्रिमंडळात पाच मोठे निर्णय



शेतकरी आंदोलना दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले असून एफआरपीच्या दरामध्ये वाढ केली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानात अतिरिक्त उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसोबतच महिलांसाठी सुद्धा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, त्यात महिलांच्या सुरक्षेसाठी अंब्रेला योजना आणली आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत


 


 


 


हेही वाचा>>>


FRP मध्ये वाढ, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय!