Satyapal Malik CBI Raid :  देशभरात सीबीआयने (CBI) 30 ठिकाणी छापे मारलेत. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक ( Satyapal Malik) यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आलेत. मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणा इथे हे छापे मारण्यात आलेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आलेत. किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. 






एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार,जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयची ही छापेमारी  केली आहे. या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. किरू जलविद्युत परियोजना (624 मेगावाट), एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. प्रकल्पामध्ये प्रत्येकी 156 मेगावॅट क्षमतेच्या 4 युनिट्ससह 135 मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.






दरम्यान, किरू हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट कॉन्ट्रैक्ट संदर्भात सीबीआयनं छापा मारल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही सत्यपाल मलिक यांच्या घर आणि कार्यालयात सीबीआयनं छापेमारी केली आहे. मे 2023 मध्ये सीबीआयनं अशाच पद्धतीने 12 ठिकाणी छापेमारी केली होती. यामधील एक ठिकाणी सत्यपाल मलिक यांचा माजी सहकाऱ्याचं होतं. सीबीआयनं त्यावेळी सौनक बाली यांच्या घरी छापेमारी केली होती. बाली हे सत्यपाल मलिक यांचे माध्यम सल्लागार राहिले आहेत. आता सीबीआयनं किरू हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट संदर्भात 30 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये सत्यपाल मलिक यांच्या घराचा आणि कार्यालयाचा समावेश आहे. 


दरम्यान, सत्यपाल मलिक यांचा प्रवास सपामधून सुरु झाला होता. ते काही काळ भाजपमध्येही कार्यकरत होते. त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. त्यांनी जम्मू काश्मीरचं राज्यपाल म्हणून काम पाहिलेय. 


आणखी वाचा :


Gajanan Kirtikar: आम्हाला काहीच सांगितलं जात नाही, आमचं मत विचारात घेतलं पाहिजे; जागावाटपाच्या मुद्द्यावरुन गजानन कीर्तिकर वैतागले