PM Modi 100 Million Followers : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडिया म्हणजेच ट्वीटरवर 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्लोबल लिडर बनले आहेत. मोदी आता एक्स मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. महत्त्वाचं म्हणजे देश-विदेशातील दिग्गन नेते याबाबतीत त्यांच्या आसपासही नाहीत. इतकंच काय तर भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यालाही मोदींनी फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकलं आहे.


पीएम मोदी बनले ग्लोबल लिडर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 100 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान मोदी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच पूर्वीचं ट्विटर प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले आहेत. पीएम मोदींनी ग्लोबल लिडर बनून एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे.


विराट कोहली, टेलर स्विफ्ट, बायडन आसपासही नाहीत


एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 100 मिलियन म्हणजे 10 कोटी फॉलोअर्स आहेत. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 38.1 मिलियन फॉलोअर्स, दुबईचे प्रिंस शेख मोहम्मद 11.2 मिलियन फॉलोअर्स आणि पोप फ्रान्सिस 18.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्सच्या बाबतीत या जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदी खूप पुढे आहेत.


पंतप्रधान मोदींची खास पोस्ट






'X'वर 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार


पंतप्रधान मोदी यांनी 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यावर एक्स मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे. "X वर 100 दशलक्ष! या सोशल मीडिया प्लॅटफॉवर आल्यावर चर्चा, वादविवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद, विरोधकांची टीका या सर्व गोष्टींचा आनंद घेता आला. भविष्यातही तितक्याच या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न असेल." अशी पोस्ट मोदींनी केली आहे.


भारतात इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स जास्त आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे 26.4 मिलियन फॉलोअर्स आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 27.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.


विराट कोहली, टेलर स्विफ्टला टाकलं मागे


पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सच्या बाबतील संख्या टेलर स्विफ्ट (95.3 दशलक्ष), लेडी गागा (83.1 दशलक्ष) आणि किम कार्दशियन (75.2 दशलक्ष) यांसारख्या जागतिक सेलिब्रिटींनाही मागे टाकलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींचे एक्सवरील फॉलोअर्स जगातील सर्वात लोकप्रिय क्रीडापटू आणि सेलिब्रिटींच्या तुलनेत खूप पुढे आहेत. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे एक्स मीडियावर 64.1 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार जूनियर (63.6 मिलियन फॉलोअर्स) आणि अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (52.9 मिलियन फॉलोअर्स) यांच्यापेक्षा त्यांचे फॉलोअर्स अधिक आहेत.