Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एका उद्योगपतीबरोबरच ते ट्विटरचे अॅक्टिव्ह यूजर म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. ते ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह असतात आणि त्यांच्या फॉलोअर्स आणि इतर ट्विटर यूजर्सने त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील ते देत असतात. पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवर एक जबरदस्त उत्तर दिलं आहे. त्यांच्या या उत्तराने लोकांची मनं जिंकली आहेत. वास्तविक, एका ट्विटर युजरने त्यांना गेल्या महिन्याच्या 10 तारखेला म्हणजेच नोव्हेंबरमध्ये विचारले होते की, तुम्ही जगातील 73 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तुम्ही पहिले कधी होणार?


यावर आनंद महिंद्रा यांनी आज उत्तर दिले आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, “सत्य हे आहे की मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही. कारण ही माझी इच्छा कधीच नव्हती." त्यांच्या या उत्तरावर इतर यूजर्सनी त्यांच्या उत्तराचं भरभरून कौतुक केलं आहे. एका यूजरने लिहिले आहे की, तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात, ते पुरेसे आहे.






मुद्दा कुठून आला?


10 नोव्हेंबर रोजी आनंद महिंद्रा यांनी एका चित्रपटाचा GIF शेअर केला आणि सांगितले की त्यांचे ट्विटरवर 10 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. ते म्हणाले, “माझ्या फॉलोअर्सची संख्या पाहिल्यावर माझी प्रतिक्रिया साधारण अशीच होती." माझे कुटुंब इतके मोठे आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. असेच कनेक्टेड रहा." या ट्विटखाली एका यूजरने विचारले होते की, तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? महिंद्रा यांच्या या उत्तरावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने म्हटले की, प्रत्येक भारतीयांच्या हृदयात तुम्ही कायमचे नंबर 1 व्यक्ती आहात.


GDP अंदाजाबद्दल उत्साहित


6 डिसेंबर रोजी आनंद महिंद्रा यांनी जागतिक बँकेने भारताचा GDP वाढीचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत वाढवल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. त्यांनी लिहिले की, आजच्या काळात जीडीपीमध्ये सुधारणा पाहणे खूप कठीण आहे. ते पुढे म्हणाले की, “आता अधिक ऊर्जा वाढवणारी गोष्ट म्हणजे हा अंदाज चुकीचा सिद्ध करणे आणि आपला जीडीपी 7 टक्क्यांच्या वर नेणे.” जागतिक बँकेने 6 डिसेंबर रोजीच भारताच्या GDP वाढीचा अंदाज सुधारला होता. जागतिक बँकेनुसार या आर्थिक वर्षात महागाईचा दर 7.1 टक्के राहील.


महत्वाच्या बातम्या : 


Small Saving Scheme Interest Rate : PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, नवीन वर्षात व्याजदर वाढण्याची शक्यता