नवी दिल्ली : आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात ते बोलत होते.


भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता बैठकीला सुरुवात झाली. या व्हर्च्युअल बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि नेते सहभागी झाले आहेत.


कोणताही भारतीय सैनिक ताब्यात नसल्याचे चीनकडून स्पष्ट; भारतानंतर चीनकडूनही 'त्या' बातमीचं खंडन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातील महत्वाचे मुद्दे




  • आपल्या एक इंच जमिनीकडे कोणी डोळे वर करुन पाहू शकत नाही, एवढी क्षमता आज आपल्याकडे आहे.

  • आज भारतीय लष्कर वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी लढण्यास सक्षम आहे.

  • मागील काही वर्षात सीमा भाग सुरक्षित करण्यासाठी बॉर्डर भागात मोठ्या प्रमाणात इंफ्रास्ट्रक्चर उभारण्यास प्राथमिकता दिली आहे.

  • आपल्या लष्कराची गरज असलेले लढाऊ विमान, आधुनिक हेलीकॉप्टर, मिसाइल डिफेन्स सिस्टम इत्यादीवर आपण भर दिला आहे.

  • नवीन इंफ्रास्ट्रक्चरमुळे खासकरुन LAC मध्ये आपली पेट्रोलिंग करण्याची क्षमता वाढली आहे.


India China Face off |चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची अखेर सुटका! सरकारचं मात्र घटनेवर मौन

  • पेट्रोलिंग वाढल्यामुळे सावधानता वाढली आहे आणि LAC वर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे.
    ज्या भागांवर पूर्वी जास्त लक्ष ठेवता येत नव्हतं त्या ठिकाणीही आपले जवान चांगल्या पद्धतीने मॉनिटर करत आहेत.

  • आतापर्यंत ज्यांना कोणी विचारत नव्हते, रोखत नव्हते, त्यांनी आता टप्प्याटप्यावर आपले सैनिक रोखत आहेत. त्यामुळे तनाव वाढत आहे.


काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे सरकारला रोखठोक प्रश्न

  • चिनी सैनिकांनी कोणत्या तारखेला लडाखमध्ये आपल्या सीमाभागात घुसखोरी केली.

  • सरकारला घुसकोरी केल्याचं कधी कळालं? 5 मे रोजी याची माहिती मिळाली की त्या आधी?

  • सरकारला नियमितपणे आपल्या देशाच्या सीमाभागातील सॅटेलाइटद्वारे घेतलेली छायाचित्र मिळत नाही का?

  • आपली गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे सरकाला वाटते का?


सीमावाद मुत्सद्दीपणाने हाताळायला हवा : शरद पवार
गेल्या काही दशकापासून चीन त्यांच्या लष्कराची ताकद वाढवत आहे. लडाख भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य हाती घेतले आहे. पूर्व लडाख सीमा भागात चीनने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात चीन त्यांची ताकद वाढवत आहे. गलवान खोऱ्यातील मोठा भूगाग चीनने व्यापला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा वाद मिटवायचा असेल तर हा विषय मुत्सद्दीपणाने हाताळण्याचा सल्ला राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

PM Modi calls meeting | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक