नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर अद्यापही तणावग्रस्त वातावरण आहे. याचदरम्यान दोन्ही देशात झालेल्या झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले. याचवेळी चीनने भारताचे काही सैनिक ताब्यात घेतले होते. मात्र, भारतीय सैन्याने या बातमीचं खंडन केलं होतं. याच मुद्द्यावर आता चीनने देखील शिक्कामोर्तब केलंय. आमच्या ताब्यात कोणाताही भारतीय सैनिक नसल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे चीनच्या तावडीत कालपर्यंत आपले 10 जवान होते, काल त्यांची अखेर सुटका झालीय. द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं या घटनेशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय.


चीनचे पत्रराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांना भारत-चीन सीमावादाच्या परिस्थितीवर विचारलेल्या प्रश्नावर, आम्ही कोणत्याही भारतीय सैन्याला ताब्यात घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, या घटनेशी संबंधित अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं अनेक प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांनी मात्र चीनने 10 भारतीय जवानांना सोडल्याचे वृत्त दिलंय. काल म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता भारताच्या 10 जवानांची सुटका चीननं केल्याचं वृत्त आहे. या 10 जणांमधे 2 मेजर, 2 कॅप्टन असे एकूण 4 अधिकारी तर 6 सैनिक आहेत. गेल्या चार दिवसांपासून जी लष्करी पातळीवरची चर्चा सुरु होती, ती याच जवानांच्या सुटकेसाठी होती असाही दावा आता केला जातोय.





भारतीय लष्कराकडून बातमीचं खंडन
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात तीन दिवसांपूर्वी चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीनंतर अनेक सैनिक बेपत्ता असल्याचा दावा भारतीय लष्कराने गुरुवारी फेटाळून लावला होता. लष्कराने दिलेल्या एका निवेदनात, कोणताही भारतीय सैनिक कारवाईत बैपत्ता झाला नसल्याचे, म्हटलं होतं.

India China Face off |चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची अखेर सुटका! सरकारचं मात्र घटनेवर मौन

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर चिनी सैन्याने भारतीय लष्करातील काही सैनिकांना बंदी बनवल्याचे वृत्त आहे. या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. चीनने अद्याप त्याच्या सैन्याची जीवितहानी जाहीर केलेली नाही.


Aircraft P8I at LAC | चिनी सैन्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी नौदलाकडून 'पी 8 आय' एअरक्राफ्ट तैनात