नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्यात पोहोचले आहेत. प्रभावित भागाची हवाई सफर करत ते चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे एक बैठक घेतली. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
या बैठकीनंतर तौक्ते चक्रीवादळामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 45 जणांचा तर महाराष्ट्रात 6 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातला 1 हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर
पंतप्रधानांनी आज केवळ गुजरातचा दौरा केला. पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातला तातडीच्या मदतीसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्र, गोव्याल्या देखील चक्रीवादळाचा फटका बसला आहे.
मोदी महाराष्ट्रात येऊ शकले असते : नवाब मलिक
तोक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना बसला आहे. पंतप्रधान मोदी गुजरात, दीव-दमणचा दौरा करत आहे. ते महाराष्ट्रात येऊ शकले असते. गोव्याहून सुरुवात केली असती तर फक्त अर्धा तास लागला असता. ते भेदभाव करत आहेत का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. केंद्रीय पथक येत नाही हा आमचा अनुभव आहे. केंद्रीय पथक आलं असतं, पंतप्रधानांनी दौरा केला असता तर महाराष्ट्राला मदत मिळण्यास फायदा झाला असता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले. मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि मदत याबाबत चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील तोक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री येत्या शुक्रवारी (21 मे) कोकणात जाणार असून तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
संबंधित बातम्या :