PM Modi Pune Visit LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. त्याआधी पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेकमध्ये देखील लसीसंदर्भात भेट देणार आहेत.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Nov 2020 04:57 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटच्या आवारात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटच्या आवारात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, थोड्याच वेळात सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, थोड्याच वेळात सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला आणि ते आता हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Corona Vaccine | जगभरातील कोरोना लसीची चाचणी कोणत्या टप्प्यावर? लस कधीपर्यंत उपलब्ध होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.
पंतप्रधान हे आपल्या पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे .
या सुचनेमुळेच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्कमध्ये तिथल्या लसीच्या निर्मिताचा आढावा घेत माहिती घेतली
पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्कमध्ये भेट देतील त्यानंतर ते दुपारी 1.30 पर्यंत पंतप्रधान भारत बायोटेक, हैदराबादला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यात येतील. पुण्यात Serum Institute ला ते 4:30 वाजता भेट देतील अशी माहिती आहे.
पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्कमध्ये पोहोचले आहेत. ते सध्या तिथल्या लसीच्या निर्मिताचा आढावा घेत आहेत.
: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी पूर्ण झाल्याचं सांगितलं होतं.
पीएमओने केलेल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील कामाबाबत पाहणी करणार आहेत. ते यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये भेट देणार आहेत.
पार्श्वभूमी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं होतं.
पीएमओने केलेल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील कामाबाबत पाहणी करणार आहेत. ते यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये भेट देणार आहेत.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्कमध्ये भेट देतील त्यानंतर ते दुपारी 1.30 पर्यंत पंतप्रधान भारत बायोटेक, हैदराबादला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यात येतील. पुण्यात Serum Institute ला ते 4:30 वाजता भेट देतील अशी माहिती आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत.