Yahoo 2021 Year in Review: सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तीमत्त्वांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. मागील वर्षाचा अपवाद वगळता वर्ष 2017 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत अव्वल स्थानावर आहेत. मागील वर्षी बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेकांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
Yahoo Year in Review मध्ये नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केलेली बातमी, व्यक्तीमत्त्वे, विविध कार्यक्रम आणि बातम्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आढावा घेतला जातो. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. तर, तिसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर देशाच्या राजकीय पटलावर अधिक ठळकपणे त्यांची दखल घेतली जाऊ लागली.
या यादीच्या चौथ्या स्थानावर दिवंगत टीव्ही मालिका अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खानचाही या यादीत समावेश झाला आहे. दोन महिन्यापूर्वी आर्यन खानवर एनसीबीने कारवाई केली होती. त्यानंतर आर्यन चर्चेत होता. आर्यन खान या यादीत सातव्या स्थानावर आहे.
सेलिब्रेटींच्या यादीत कोणाचा समावेश ?
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्याबद्दल सर्वाधिक माहिती घेतली गेली. सिद्धार्थ शुक्ला याच्याबाबत जाणून घेण्यास नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. त्याशिवाय कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार याची अकाली एक्झिटही चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. पुनीत राजकुमार हे या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- शिवसेनेचा 'सामना'तून ममता दीदींवर निशाणा, यूपीएचं कौतुक तर काँग्रेसला सल्ला
- कोट्यवधी खर्चून केलेल्या रस्त्याच्या उद्घाटनाला नारळ फोडताना पडला खड्डा, नारळ काही फुटला नाही!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha