PM Modi Meeting With All State CM : देशात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मोदी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील. देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज ही बैठक घेणार आहेत.


गेल्या दोन आठवड्यांत देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस?
या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करू शकतात. दरम्यान, कोविड संदर्भात पीएम मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील कोविडची परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Corona : देशात पुन्हा कोरोनामुळे धोक्याची घंटा; जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये किती वाढली रुग्णांची संख्या?


Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 153 कोरोना रुग्णांची नोंद तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 943 वर


Modi Govt 8 Year: मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्या जल्लोषाची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लान