नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करणार आहे. यासाठी मोदी विशेष विमानाने राजधानी दिल्लीहून सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. पंरतु आजच्या या ऐतिहासिक दिवसासाठी मोदींचा पेहराव नेहमीपेक्षा वेगळा आहे. मोदी सामान्यत: चुडीदार पायजमा आणि कुर्ता परिधान करतात. मात्र आज पारंपरिक सोनेरी-पिवळा कुर्ता, धोती आणि गळ्यात गमछा घालून रवाना झाले आहेत.


पंतप्रधानांच्या पेहरावाने सगळेच आश्चर्यचकित
सामान्यत: चुडीदार पायजमा आणि कुर्ता परिधान करणारे पंतप्रधान मोदींच्या कपड्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. सोनेरी-पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची धोती परिधान केलेले पंतप्रधान विशेष आपल्या विमानात चढले. पंतप्रधानांनी या विशेष सोहळ्यासाठी विशेष पेहराव परिधान केला आहे. हिंदू धर्मात सोनेरी आणि पितांबरी रंग अतिशय शुभ समजला जातो. भूमिपूजनासाठी पंतप्रधांनानी हे कपडे परिधान केल्याचं म्हटलं जात आहे.


ABP Exclusive | राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललासाठी रत्नजडीत पोशाख 


राममंदिरासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न वाखाणण्यासारखे, बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे


Bhumi Pujan | पंतप्रधान मोदी चांदीच्या विटेने करणार राम मंदिराची पायाभरणी, कार्यक्रमानंतर लॉकरमध्ये ठेवणार विट


पंतप्रधान मोदींचा संपूर्ण कार्यक्रम
पंतप्रधान मोदी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी दिल्लीहून लखनौला रवाना झाले
एक तासाने म्हणजेच 10 वाजून 35 मिनिटांनी लखनौमध्ये दाखल झाले
इथून पाच मिनिटांनी म्हणजेच 10 वाजून 40 मिनिटांनी ते अयोध्येसाठी रवाना होतील.
मोदी साडे अकराच्या सुमारास अयोध्येत पोहोचतील
साडेबारा वाजता ते भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
12 वाजून 40 मिनिटांनी मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होईल.
राम मंदिराची पायाभरणी चांदीचा फावडा आणि चांदीच्या विटेने होणार आहे.


तेव्हा मोदी म्हणाले होते, मंदिर बनल्यानंतर अयोध्येत येणार
नरेंद्र मोदी 29 वर्षांपूर्वी अयोध्येत गेले होते. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना अयोध्येत पुन्हा कधी येणार असा प्रश्न विचारला होता. त्यावर मंदिर बनल्यानंतर इथे येणार असं उत्तर मोदींनी दिलं होतं. आता खुद्द मोदींच्याच हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :




Ram Mandir Bhumi Pujan | पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीवरुन लखनऊसाठी रवाना