PM modi Jammu Kashmir Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू (Jammu Kashmir) दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी शनिवारी, अधिकाऱ्यांनी फ्लाइंग ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्टवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
कलम 144 अंतर्गत हा आदेश जारी
पंतप्रधानांच्या जम्मू दौऱ्याविषयी माहिती देणाऱ्या प्रवक्त्याने सांगितले की, जम्मूचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार वैश यांना संभाव्य सुरक्षा धोक्यांशी संबंधित गुप्तचर अहवाल प्राप्त झाला आहे, त्यानंतर त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानंतर हा आदेश औपचारिकपणे अंमलात आणला आहे, जो 20 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आदेशाचा दाखला देत प्रवक्त्याने सांगितले की, जम्मूमध्ये ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलूनवर बंदी असेल.
निर्बंधातून कोणाला सूट दिली जाईल?
प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवादी आणि देशविरोधींच्या संभाव्य कारवायांना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान तसेच व्हीव्हीआयपींच्या भेटीदरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या हवाई निगराणीचा देखील समावेश असणार आहे. ते पुढे म्हणाले की, संरक्षण आणि निमलष्करी दलांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते.
पंतप्रधान मोदी जनसभेला संबोधित करणार
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात रॅलीला संबोधित करतील. कटरा-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा थांबा पाहण्यासाठी उधमपूर या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात गेले असता त्यांनी हे वक्तव्य केले होते. इथल्या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी उधमपूर आणि कठुआ रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा थांबा देखील सुरू करण्यात आला आहे.
पंतप्रधान करणार 3,161 कोटी रुपयांच्या 209 प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी 20 फेब्रुवारी रोजी जम्मू येथे 3,161 कोटी रुपयांच्या 209 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी येत आहेत. ते जम्मूतील मौलाना आझाद स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली, बीएसएफ आणि पोलिसांनी संयुक्तपणे सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये दोन तास सर्च ऑपरेशन केले. ते म्हणाले की सकाळी 9.45 च्या सुमारास ऑपरेशन सुरू झाले, तथापि, संयुक्त पथकाला काहीही संशयास्पद आढळले नाही.
इतर बातम्या>>>
Ram Mandir UAE : PM मोदींनी अबुधाबीत राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी 'कुराण' चा केला उल्लेख, काय म्हणाले पंतप्रधान जाणून घ्या