Vaman Meshram on EVM : ईव्हीएम विरोधातील जनआंदोलनाची रणनिती सांगतो. EVM फोडण्याकरता कमिटी तयार कराव्या लागतील , असे वादग्रस्त विधान भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम (Vaman Meshram) यांना केलय. ईव्हीएम विरोधी जनपरिषदेत ते बोलत होते. आपल्याला ईव्हीएम फोडण्यासाठी बुथ लेवलच्या कमिट्या बनवाव्या लागतील. 13 लाख ते 15 बुथ असण्याची शक्यता आहे. एका महिन्यात बुथ लेवलच्या कमिट्या बनविता येतील. सर्व कमिटी झाल्या तर, तिथे ईव्हीएम फोडण्यासाठी तुम्ही तिथे तयार असले पाहिजे, असे वामन मेश्राम यावेळी म्हणालेत.
'15 लाख लोकांनी ईव्हीएम फोडले तर कोणालाही जेल होणार नाही'
वामन मेश्राम म्हणाले, एक माणूस तिथे जाऊन ईव्हीएम फोडणार त्यावेळी निवडणूक आयोग तिथे दुसरी मशीन लावेल. त्यामुळे एका कमिटीत कमीतकमी 5 माणसे असायला हवीत. पाच वेळा मशीन फोडावी लागली तर पाच वेळा फोडा. 15 लाख लोकांनी ईव्हीएम फोडले तर कोणालाही जेल होणार नाही. एकाच माणसाने ईव्हीएम मशीन फोडली तर तुरुंगात जावे लागेल. 15 लाख लोकांनी फोडले तर नॅशनल अजेंडा होईल. मी तुम्हाला आंदोलनाची रणनितीही सांगत आहे, असे वेश्राम यांनी यावेळी नमूद केले.