Ram Mandir UAE : UAE मधील पहिल्या मंदिराची स्थापना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. अबुधाबीतील (Abu Dhabi) पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुराणचा उल्लेख केला. ते म्हणाले की, हे मंदिर जगाच्या विविधतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती आणि अयोध्येतील राममंदिराबाबत देखील उपस्थितांना सांगितले.

  


 


पंतप्रधान मोदींकडून कुराणचा उल्लेख


दुबई-अबू धाबीतील हे मंदिर शेख झायेद महामार्गावरील अल रहबाजवळ 27 एकर जागेवर सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे. अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मंदिराच्या भिंतींवर केवळ हिंदू धर्माचे प्रतीकच नाही तर इजिप्शियन चित्रलिपी आणि कुराणातील कथा देखील कोरल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, हे मंदिर धर्मांमधील सद्भावना आणि जगाच्या एकतेचे प्रतीक बनेल. तसेच हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नसून मानवतेच्या समान वारसाचे प्रतीक आहे.


 






 


पंतप्रधान मोदींनी आपले जीवन भारत मातेला समर्पित असल्याचे वर्णन केले. देवाने दिलेले शरीर आणि वेळ हे सर्व भारतमातेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. आपली संस्कृती आणि आपली श्रद्धा आपल्याला जगाच्या कल्याणासाठी कटिबद्ध ठेवते, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्रानुसार भारत काम करत आहे. ते म्हणाले की अबुधाबी मंदिराची मानवतावादी प्रेरणा आमचे संकल्प मजबूत करेल आणि त्यांची पूर्तता करेल.


 


राम मंदिराचीही आठवण


यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताचा अमृत काल साजरा करताना राम मंदिराचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, गेल्या महिन्यातच अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. रामलला त्यांच्या नवीन निवासस्थानी विराजमान झाले आहेत. संपूर्ण भारत आणि प्रत्येक भारतीय त्यांच्या प्रेमात आणि भावनेत दंग झालेला आहे.


 


 






 


हेही वाचा>>


UAE Hindu Temple : अबू धाबीतील पहिलं हिंदू मंदिर, बीएपीएस हिंदू मंदिराची खासियत काय? वाचा वैशिष्ट्ये