PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दोन दिवसीय गुजरात (Gujarat) दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी नवीन योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधान मोदी यांनी हिंमतनगर (Himmatnagar) जवळील साबरकाठा येथील डेअरी प्लांटचं उद्घाटन यासोबत साबर डेअरीसाठीच्या 1000 कोटींच्या योजनांचं उद्घाटन केलं. साबरकाठा सहकारी दुग्ध उत्पादक संघाच्या (साबर डेअरी) 305 कोटी रुपयांच्या दूध पाउडर यंत्राचं उद्घाटन केलं.


साबर डेअरीचा विस्तार
पंतप्रधान मोदी यांची साबर डेअरीच्या योजनांचं उद्घाटन करत सांगितलं की साबर डेअरीचा विस्तार झाला आहे. यामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. गुजरातमधील डेअरी मार्केट एक लाख कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचलं  आहे. नवीन योजनांमुळे छोटे-मोठे उद्योजकांना आणखी मदत होईल.


पंतप्रधान मोदी IIBX चा शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथील भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला (IFSC) भेट देतील. पंतप्रधानांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज (IIBX) चा शुभारंभ करण्यात येईल. IFSC प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक्सचेंज भारतातील सोन्याच्या आर्थिकीकरणाला चालना देईल.






NSE IFSC मुख्यालयाची पायाभरणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी इंटिग्रेटेड रेग्युलेटरी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटीच्या मुख्यालयाची पायाभरणीही करतील. पंतप्रधानांच्या हस्ते NSE IFSC-SGX Connect यांचं देखील उद्घाटन करण्यात येईल. यामुळे Singapore Exchange Limited (SGX) च्या सदस्यांनी दिलेल्या निफ्टी डेरिव्हेटिव्ह्जवरील सर्व ऑर्डर NSE-IFSC ऑर्डर मॅचिंग आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर वळवल्या जातील आणि एकमेकांशी जोडल्या जातील.


महत्त्वाच्या इतर बातम्या