MH-60 Romeo Helicopter India Delivery : भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आता आणखी वाढणार आहे. भारताने अमेरिकेसोबत MH-60 रोमियो हेलिकॉप्टरसाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत हेलिकॉप्टरची खेप भारतात दाखल झाली आहे. या अंतर्गत दोन MH-60 रोमियो हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले आहेत. भारताने अमेरिकेशी MH60R हेलिकॉप्टर पुरवण्याबाबत करार केला होता. त्यानुसार 24 हेलिकॉप्टरपैकी दोन हेलिकॉप्टर भारताला मिळाली आहेत.
भारताला मिळणार 24 MH-60 रोमियो हेलिकॉप्टर
नौदलाची पाणबुडी-विरोधी/पृष्ठभागविरोधी युद्ध आणि देखरेख क्षमता मजबूत करण्यासाठी भारताने 2020 मध्ये अमेरिकेकडून 24 लॉकहीड मार्टिन-सिकोर्स्की MH-60R हेलिकॉप्टरची मागणी केली होती. अमेरिकेकडून भारताला या हेलिकॉप्टरची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. दोन मार्टिन-सिकोर्स्की MH-60R हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले आहेत.
पुढील महिन्यात पोहोचेल नवीन खेप
भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देस सांगितलं की, अमेरिकेहून गुरुवारी दोन 24 MH-60 रोमियो हेलिकॉप्टर कोचीन विमानतळावर दाखल झाले आहेत. पुढील महिन्यात हेलिकॉप्टरी पुढची खेपही भारतात पोहोचेल. अमेरिकेसोबत केलेल्या कराराअंतर्ग भारताला एकूण 24 हेलिकॉप्टर मिळणार आहेत.
लॉकहीड मार्टिन-सिकोर्स्की MH-60R हेलिकॉप्टरची खासियत
लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशनद्वारे निर्मित MH-60R हेलिकॉप्टर हे सर्व हवामानातील (All-Weather) हेलिकॉप्टर आहे जे अत्याधुनिक एव्हियोनिक्स आणि सेन्सर्ससह डिझाइन केलेलं आहे. भारताने अमेरिकेसोबत सुमारे 15,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यानुसार भारताने 24 हेलिकॉप्टर खरेदी केले आहेत. MH-60R हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी युद्ध, जहाजविरोधी स्ट्राइक, विशेष सागरी ऑपरेशन तसेच शोध आणि बचाव कार्यांसह विविध भूमिकांमध्ये कामगिरी बजावेल.